मनोहर भोये, प्रबंधभूमी न्युज
पेठ शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग नाशिक पेठ धरमपुर रस्त्यावर पेठ कडून वांगणीकडे जाणाऱ्या दुचाकीस कार ने धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. MH 15 JE 4521 या दुचाकी वरून धरमपुरच्या दिशेने जाणारे अनिल धनवले वय 21 व दशरथ प्रधान वय 19 दोघेही राहणार वांगणी ता पेठ यांना कार क्र. MH 15 ES 2340 या कार ने धडक दिली, यात अनिल धनवले याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दशरथ प्रधान यास नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आले असता - त्याचा उपचारादरम्यान मूर्त्यू झाला. सदर अपघाताची नोंद पेठ पोलीस ठाणे येथे केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर भोये पेठ