द्वारा : वैभव भांबर, प्रबंधभूमी न्युज
आर. आर. आबा पाटील सुंदर गाव योजनेत चांदवड तालुक्यातील कोकणखेडे तर निफाड तालुक्यातील तामसवाडी या दोन्ही ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम आल्या. त्यांना ४० लाख रुपयांचे बक्षीस विभागून दिले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तपासणी समितीने केलेल्या तपासणीनंतर ही निवड जाहीर करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात प्रथम ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाखांचे बक्षिस लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे तामसवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच धनंजय आप्पा कांदे यांच्या सर्वच स्थरातून कौतुक होत आहे तसेच नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे..