द्वारा : जय राजू गांगुर्डे सह उमेश खांडवी, प्रबंधभूमी न्युज
मतदान हा आपला हक्क व अधिकार आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. अशी आपण लोकशाहीची व्याख्या करतो. यामध्ये मतदानाचा हक्क बजावणे हा आपला अधिकार व जबाबदारी आहे. आणि ती आपण बजवलीच पाहिजे, अनेकदा अनेकजण हा हक्क बजावत नाही. किंवा योग्यवेळी मतदाराची नोंदनी करत नाही. यामुळे पुर्ण मतदान होत नाही. आणि योग्य व्यक्ती निवडून येत नाही.
मतदारराजा जागा हो लोकशाहीचा धागा हो. 18 वर्ष झाले की जबाबदार नागरिक बनायचं असतं. मतदार यादीत नाव नोंदवा व मतदानाचा हक्क बजवा . आणि आपली आदर्श लोकशाही बळकट करावी. या उद्देशाने सुरगाणा तहसील कार्यालय , बिरसामुंडा चौक, होळी चौक,झेंडा चौक ठिकाणी पथनाट्यद्वारे व सायळपाडा, वांगणपाडा, राशा, जि.प.शाळा रांगोळी स्पर्धेतून मतदान जनजागृती कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या *स्वीप कार्यक्रमा अंतर्गत* सुरगाणा तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सध्या लोकसभेचे वारे वाहू लागल्याने लोकांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश मतदान जनजागृती कार्यक्रम पथनाट्य द्वारे दाखविण्यात आला. या वेळी
सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड, निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, प्रशासक नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, निवडणूक नायब तहसीलदार सुयोग वाघमारे, पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश पोतदार, गट शिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी जय राजू गांगुर्डे सह उमेश खांडवी सुरगाणा