द्वारा : अजहर शेख, प्रबंधभूमी न्युज
मनमाड शहरातील सार्वजनिक मुताऱ्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असुन अनेक मुताऱ्या या मोडकळीस आल्या आहेत शहरात स्वच्छ भारत अंतर्गत अनेक ठिकाणी भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देण्यात आला मात्र स्वच्छता होत नाही मुताऱ्यामधे दुर्गंधी येत आहे या सगळया कडे पालिकेच्या सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे येत्या आठ दिवसांत जर या मुताऱ्या स्वच्छता करून डागडुजी केली नाही तर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी दिला आहे.
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी अजहर शेख,मनमाड