वैभव भांबर, प्रबंधभूमी न्युज
चांदवड : मातारमाईआंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चांदवड तालुका व शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय मा.खा.ॲड.बाळासाहेब_आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा मा_रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागात वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखा व वार्ड शाखेच्या फलकाचे उद्घाटन युवा जिल्हाध्यक्ष किरणभाऊ मगरे व जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
चांदवड तालुक्यातील तालुकाध्यक्ष संतोष केदारे शहराध्यक्ष योगेश जगताप यांच्या पुढाकाराने शहरी व ग्रामीण भागात कोंबडवाडी,रमाई नगर,पंचशील नगर,सरकारी हॉस्पिटल जवळ,मंगरूळ येथे एकूण सहा शाखा बांधणी करण्यात येवून उद्घाटन आले.
शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हा नेते आनंद आढाव.जिल्हा सहसचिव राजू धिवरे,जिल्हा प्रवक्ता यशवंत निकम,जिल्हा आयटी प्रमख मुकेश खैरनार,मंगेश केदारे,मालेगाव तालुकाध्यक्ष शशिकांत पवार,चांदवड तालुका महासचिव प्रवीण वानखेडे यांच्यासह चांदवड तालुका/शहर पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित शाखा पदाधिकारी उपस्थित होते.
मंगरूळ गांवी शाखा उद्घाटन करून मंगरूळ येथील वंचित बहुजन आघाडीचे समर्थक, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक निरभवने यांच्यासह इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
आभारप्रदर्शन तालुकाध्यक्ष संतोष केदारे यांनी केले.