चांदवड

CHANDWAD | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी काळ्या साड्या परिधान करून शासनाचा केला निषेध

द्वारा : वैभव भांबर, प्रबंधभूमी न्युज
चांदवड तालुक्यातील  आशा - गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने  दि. 29 डिसेंबर रोजी  ऑनलाईन  कामबंद आंदोलन करुन  दि.  12 जानेवारी 24  पासून  राज्यव्यापी   बेमुदत संप पुकारण्यात  आला असून याबाबत चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या कार्यालयासमोर शासणाच्या विरोधात घोषणाबाजी करत काळा साड्या परिधान करून शासनाचा निषेध करण्यात आला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे नाशिक दौऱ्यावर आले असता पंचवटी पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी  आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष व किसान सभेचे  नेते कॉ.राजु देसले यांना ताब्यात घेतले  व पोलीस कोठडीत टाकले त्यांना कोठडीत जेवण सुध्दा दिले नाही या घटनेचा आशा गटप्रवर्तकांनी जाहीर निषेध व्यक्त करुन  त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आशा गटप्रवर्तक  तीव्र आंदोलन छेडतील अशा देखील घोषणा देण्यात आल्या.

प्रबंधभूमीसाठी वैभव भांबर चांदवड

Related News